क्राईम : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून
चाकणच्या आंबेठाण चौकातील साई पॅराडाईज मधील घटना
महाबुलेटिन नेटवर्क
चाकण : चारित्र्याच्या संशयावरून चाकण ( ता.खेड ) येथे पतीने पत्नीला लाकडी स्टम्पने मारून, हाताने व वायरने गळा दाबून खून केला असल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना आज शनिवार ( दि. ४ जुलै ) रोजी सकाळी चाकण येथील आंबेठाण चौकातील साई पॅराडाईज मध्ये घडली. ज्योती वैभव काळे असे मयत झालेल्या पत्नीचे नाव असून वैभव काळे असे आरोपी पतीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद कथोरे हे पुढील तपास करीत आहेत.