खराबवाडीत शनिवारी व रविवारी दोन दिवस कोरोना लसीकरण…
खराबवाडीत शनिवारी व रविवारी दोन दिवस कोरोना लसीकरण…
महाबुलेटीन न्यूज : प्रशासक ग्रामपंचायत खराबवाडी यांच्यावतीने खराबवाडी ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व नागरिकांसाठी ग्रामपंचायतीने शनिवार दिनांक ०३/०४/२०२१ आणि रविवार दिनांक ०४/०४/२०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी येथे सकाळी ११ ते सांयकाळी ५ या वेळेत ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर ४५ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यावयाचा आहे, असे ग्रामपंचायत प्रशासनाने कळविले आहे.
💉 लसीकरणाचे फायदे 💉
—————————–
1) 👤नागरिकांमध्ये कोरोना आजाराविरोधात उच्च रोगप्रतिकार क्षमता वाढते.
2) 🦠कोरोना मुळे १०० लोकांमध्ये २ ते ४ मृत्यु होत आहेत, ते प्रमाण एक लाखात एक इतके कमी होणार आहे.
3) 🦠कोरोनाची दुसरी लाट टाळणे आणि गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी करणे.
4) 👨👩👧👦आपले कुटुंब कोरोना आजारापासुन दुर ठेवणे.
📝 महत्वाची सुचना :- 💉लसीकरणाला येताना आपले 📇आधार कार्ड व 📲मोबाईल सोबत आणावा व कोरोना लसीकरणाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक व कोरोना समिती ग्रामपंचायत खराबवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.