खराबवाडीत ७५ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत साधेपणाने व उत्साहात साजरा
खराबवाडीत स्वातंत्र्यदिन अत्यंत साधेपणाने व उत्साहात साजरा
महाबुलेटीन न्यूज
चाकण : भारतीय स्वातंत्र्याच्या अम्रुतमहोत्सवी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खराबवाडी ( ता.खेड ) येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून स्वातंत्र्यदिन अत्यंत साधेपणाने व उत्साहात साजरा करण्यात आला.
खराबवाडी ग्रामपंचायत समोर प्रशासक व खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बापूसाहेब कारंडे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे, माजी उपसरपंच माधुरी खराबी, आशा वर्कर मंदा कड, रेखा धाडगे, रंजना लांडे, मीना खराबी, आशा जंबुकर, कविता म्हस्के यांनी ध्वजपूजन केले.
नवमहाराष्ट्र विद्यालयासमोर संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंचशील पुजारी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी सर्व आशा वर्कर व शिक्षकांनी ध्वजपूजन केले.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर पोलीस पाटील किरण किर्ते व माजी चेअरमन कांताराम कड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक काळुराम कड, भाजपचे युवा नेते राजेंद्र मल्हारी खराबी, नंदाराम कड यांनी ध्वजपूजन केले. आदर्श शिक्षिका सौ. पूनम काळे-देशमुख यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त संविधान वाचन करुन मनोगत व्यक्त केले.
यावेळी नवमहाराष्ट्र विद्यालय शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश खराबी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी, माजी सरपंच पांडुरंग बिरदवडे, माजी उपसरपंच काळुराम केसवड, माजी उपसरपंच रवींद्र धाडगे, खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कड, सचिव गोरक्षनाथ कड, संचालक हनुमंत कड, विठ्ठल बिरदवडे, तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ खराबी, ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे, लिपिक अजित केसवड, विठ्ठल वरये, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे स्वच्छता व व्यसनमुक्ती समितीचे जिल्हा उपप्रमुख हभप. दत्तात्रय खराबी, खेड तालुका अध्यक्ष हभप. सोपान खराबी, सुरेश कड, खंडू केसवड, माजी चेअरमन हनुमंत खराबी, दिनकर कड, उद्योजक संभाजी सोमवंशी, माणिक सोमवंशी, विजय खराबी, हभप. नंदाराम खराबी, राजेंद्र कड, प्रमोद टेकाळे, सुनील दगडू खराबी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माधुरीताई खराबी व सर्व सदस्य, मुख्याध्यापक अविनाश कड, मुख्याध्यापिका श्रीमती आशा पोपट जाधव, कातोरे गुरुजी, सर्व शिक्षक वर्ग, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष भुते व विजय डावरे सर यांनी केले, तर सर्व उपस्थितांचे आभार श्री. राजेश लाडके व अशोक ठाणगे सर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे, मुख्याध्यापक अविनाश कड, मुख्याध्यापक श्रीमती आशा जाधव यांनी केले.
🙏🇮🇳🌹🇮🇳🌹🇮🇳🙏