Thursday, May 15, 2025
Latest:
कोरोनाखेड

खराबवाडी गावात आणखी तीनजण कोरोना पॉझिटिव्ह, भाजीविक्रेता निघाला पॉझिटिव्ह, रुग्णांची एकूण संख्या सात

महाबुलेटिन नेटवर्क
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथे आणखी तीन जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावातील रुग्णांची संख्या सात झाली आहे.

मागील आठवड्यात खराबवाडीत चार जणांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर बारा जणांचे रिपोर्ट तपासणीला पाठविण्यात आले होते, त्यापैकी आज आणखी तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी एकजण गावात फिरून भाजीपाला विकत होता, त्यामुळे खराबवाडीकरांची चिंता आणखी वाढली आहे. आणखी नऊ जणांचे रिपोर्ट आज संध्याकाळपर्यंत येणार आहेत. त्यामुळे गावातील एका कुटुंबात वाढदिवसासाठी हजर राहिलेल्या सर्व व्यक्तींची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!