काव्यमंच : येता राखीचा ग सण
🌸–येता राखीचा ग सण—🌸
येतो राखीचा ग सण
पुनवेच्या संगतीला
हर्ष माझ्या सवे होतो
माझ्या कवन पंक्तीला॥
जशी भरती सागरा
भाऊ बहिण प्रितीला
काय करावे कळेना
कोरोनाच्या प्रगतीला॥
गतिरोध लावण्यास
आला अमुच्या गतीला
सणेसुदे अवकळा
आली मानव जातीला॥
तरी कविता ही आली
सवे घेऊन राखीला
शब्द फुलांनी हिनेच
सजविली ही राखीला॥
ह्याच स्विकार राखीला
भाऊ यंदाच्या स्थितीला
येता राखीचा रे सण
पुनवेच्या संगतीला ॥
— *निसर्ग सखी सौ मंगला मधुकर रोकडे.*