काव्यमंच : माझे कोटींचे नमन
🇮🇳माझे कोटींचे नमन🇮🇳
——————————–
वार तुझा बेमालूम
काय फायदा जगून
बरं जनावर ही रे
अतिरेकी तुझ्याहून ॥धृ ॥
एक ठाऊक ज्या ब्रीद
देशासाठी प्राणार्पन
माझ्या भारत भूमीचे
इथे एकेक जवान ॥१॥
अनाहुता परी येतो
अरे कायर कृतघ्न
देशावरी माझ्या का रे
असे आणतोस विघ्न ॥२॥
तुझ्या हत्यारा हत्याला
क्षमा करणार कोण
जग जाहिर झाले रे
तुझे तांडव नर्तन ॥३॥
अरे अतिरेकी तुझे
कसे द्रवते न मन
प्रति एका शहिदाला
माझे कोटींचे नमन ॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे
*🇮🇳वंदे मातरम्🇮🇳 🇮🇳वंदे मातरम्🇮🇳*