कर्नाटक सरकारचा खेड तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध..!

महाबुलेटिन न्यूज / प्रतिनीधी
चाकण : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांवर सातत्याने अन्याय करत असून तेथील सरकारने बेळगाव येथील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ रविवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२० रोजी क्रांतिदिनी माणिक चौक चाकण येथे शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा महिला संघटक विजयाताई शिंदे, शिवसेना खेड तालुकाप्रमुख रामदास आबा धनवटे, ग्राहक संरक्षक सेनेचे जिल्हा उपप्रमुख लक्ष्मण जाधव, किरण गवारे, पांडुरंग गोरे, शेखर पिंगळे, महेश जाधव, माऊली कड, रमेश शिंदे, स्वप्नील बिरदवडे, दत्ता कंद, स्वामी कानपिळे, प्रवीण मुंगसे, अभिजित जाधव, विकास मुंगसे, खेड तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व शिवसेना अंगीकृत संघटनांचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
———