इंदोरीतील कोरोनाग्रस्त महाराजांच्या संर्पकात आल्याने देहुतील ५ जण झाले कोरोनाग्रस्त
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
देहु : अंधश्रध्दा, कर्मकांडाला मुठमाती देण्याऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या श्री क्षेत्र देहुतील पाच अंधश्रध्यीय भाविक कोरोनाग्रस्त झालेल्या इंदोरी येथील एका महाराजाकडे जाऊन महाराजांच्या संर्पकात येऊन ते कोरोनाग्रस्त झाल्याने देहु गावात खळबळ उडाली आहे. देहु मध्ये कोरोना रूग्णांची साखळी वाढतच चालेल्याने १४ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्याची अग्रही मागणी देहु ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांनी केली आहे. देहु आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी माहीती देताना सांगितले की, काल सोमवार दिनांक ६ जुलै रोजी इंदोरी गावात कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या एका महाराजांच्या संर्पकात आल्याने देहुतील ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या महाराजांच्या अहवाल यापुर्वीच पॉझिटिव्ह आलेला आहे. सद्या देहुत एकुण ३७ कोरोना बाधित रूग्ण आहेत, त्या पैकी ५ बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आले असल्याचे डॉ. किशोर यादव यांनी सांगितले. देहु मध्ये वाढत्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने १४ दिवसांचा लॉकडॉऊन जाहीर करावा, अशी मागणी देहु ग्रामस्थांसह ग्रामसदस्यांनी ग्रामपंचायती कडे केली आहे. याबाबत पंचायतीच्या सभेत निर्णय होऊन लवकरच श्री क्षेत्र देहुत लॉक डॉऊन जाहीर करण्यात येणार आहे.