हा खड्डा करतोय वाहतूक कोंडी, याला जबाबदार कोण ?
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : चाकण-तळेगाव रस्त्यावर खराबवाडी येथील सारा सिटी कमानी समोर डांबरी रस्ता खोदल्याने भला मोठा खड्डा पडला असून हा खड्डा वाहतुकीस अडथळा ठरून याठिकाणी वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे, याला जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी चाकण-तळेगाव डांबरी रस्ता खोदून सारा सिटीकडे पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन नेली आहे, त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर लांबलचक खड्डा पडलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहने सावकाश घेऊन वाहतूक कोंडी होत आहे. तर हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. सकाळ व संध्याकाळी विशेषतः औद्योगिक कामगार कामावर जाताना व कामावरून सुटताना याठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊन मोठी कोंडी होते. तर अनेकदा दुचाकी चालकांचे छोटे मोठे अपघात होत आहेत.
हा खड्डा त्वरित डांबर किंवा काँक्रीट टाकून बुजविण्याची मागणी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज खराबी यांनी केली आहे.