चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी चाकण येथे ईएसआयसी कार्यालय सुरु, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या पाठपुराव्याला यश
महाबुलेटीन न्यूज
चाकण : फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने सतत प्रयत्न करून ईएसआयसी कॉर्पोरेशनच्या बिबावेवाडी कार्यालय, दिल्ली, मुंबईचे मुख्य कार्यालय यांचे बरोबर पाठपुरावा घेऊन चाकणला इएसआयसीचे कार्यालय मंजूर करून आणले. आज या कार्यालयाचे उदघाटन संपन्न झाले. ईएसआयसीची शाखा चाकणला सुरू झाल्याने लाखो कामगार आणि शेकडो कंपन्यांचे मोठी अडचण दूर होणार आहे.
ईएसआयसीने ऑगस्ट २०१६ पासून चाकण औद्योगिक क्षेत्रासाठी इएसआयसीची व्याप्ती लागू केली परंतु आजपर्यंत चाकण येथे शाखा कार्यालय नव्हते. हे कामगार आणि कंपनी प्रतिनिधींना खूप गैरसोयीचे होते. वैद्यकीय हक्क किंवा इतर समस्यांशी संबंधित कोणत्याही कामासाठी त्यांना भोसरी शाखेला भेट द्यावी लागे.
या ईएसआयसी कार्यालयाचे उद्घाटन फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शिवहरी हालन यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाला ईएसआयसी, दिल्लीचे मुख्य दक्षता अधिकारी मनोज कुमार सिंह, हेमंत पांडे, उपउपविभागीय अधिकारी उपस्थित होते. ईएसआयसी संचालक, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल, खजिनदार
विनोद जैन सुशील कुमार, ईएसआयसी उपसंचालक राजेश सिंग, महिंद्राचे जनरल मॅनेजर श्रेयश आचार्य, एफसीआयचे सर्व सदस्य आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मनोज कुमार सिंह यांनी दिल्ली येथील संबंधित विभागाशी संपर्क साधून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाला गती देण्याचे आश्वासन दिले, लवकरच या रुग्णालयाचे बांधकाम सुरू केले जाईल आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागेल आणि वैद्यकीय सेवेचा प्रश्न सोडवला जाईल. पांडे यांनी उद्योग आणि विमाधारक व्यक्ती (IP) यांना त्यांच्या उत्तम आरोग्य आणि विमा सेवांचे आश्वासन दिले. राजेश कुमार यांनी सर्व मान्यवर, आयपी आणि उद्योग प्रतिनिधींचे स्वागत केले. सुशील कुमार यांनी आभार मानले.