दुबईत खेडच्या मराठी तरुणाची व्यवसायात भरारी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय सुरु करून नवीन उद्योगात भरारी घेतली आहे. नुकतेच या व्यवसायाचे उदघाटन संपन्न झाले.
दुबईमध्ये ‘न्यू वर्ल्ड टूर्स ॲंड ट्रवल्स’ च्या ग्रँड ओपनिंग कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन आणि उपस्थिती विशेष ठरली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर. आर. आबा फाउंडेशन आणि देवगिरी प्रतिष्ठानचे विनोददादा पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे विविध व्यवसायिक क्षेत्रांतून आणि युवकांसाठी नवीन संधी समोर आल्या. कार्यक्रमात नामवंत वकील सोमनाथदादा दौंडकर, विशालदादा पाटील, दत्ताशेठ मांडळे, चंद्रशेखर जाधव, रघुनाथ सगळे, दत्ताशेठ बांगे, संतोष होले, अभिजीत भैया, दादा पवळे, अनिकेत कोकरे, अभिजीत देसाई, नितीन सगळे, किरण टोपे, अजिंक्य शिंदे, स्वराज टाकळकर, दिलीप शेलार, अमोल कांबट, नितीन साळुंके, विनोद सावंत आणि शिवा यादव आदी मान्यवरांचे सहकार्य मिळाले.
‘न्यू ड्रीम टूर्स एंड ट्रेवल्स’ चे संचालक साईनाथ कोंडीबा मांजरे व प्रवीण रामचंद्र मांजरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वांचे स्वागत आणि आभार मानले. त्यांनी व्यवसायाच्या दृष्टीने युवकांना मार्गदर्शन दिले आणि दुबई तसेच महाराष्ट्रातील युवकांसाठी बिझनेस व जीवनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण दिशा दाखवली.
या कार्यक्रमामुळे गेल्या २० वर्षांपासून नोकरी करणारा तरुणही मेहनत आणि जिद्दीनं आपले स्वप्न साकार करू शकतो, असा संदेश जनमाणसात पोहोचला आहे.
यासाठी कुटुंब प्रमुख मोठे बंधू आनंद मांजरे आणि पत्नी अस्मिता मांजरे यांचे तसेच मित्र परिवाराचे योगदान खूप मोलाचे आहे.