ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्यांनी पक्के अनुज्ञप्ती चाचणीकरीता उपस्थित रहावे : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
पुणे : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या 18 मार्च 2020 व 19 मार्च 2020 रोजीच्या ऑनलाईन अपॉईंटमेंट असणा-या अर्जदारांची चाचणी संपूर्ण टाळेबंदी लागू झाल्याने झालेल्या नाहीत. तथापि 18 मार्च 2020 रोजी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्यांनी 1 ऑगस्ट 2020 रोजी व 19 मार्च 2020 रोजी ऑनलाइन अपॉईंटमेंट घेतलेल्यांनी 2 ऑगस्ट 2020 रोजी कार्यालयीन वेळेमध्ये अपॉईंटमेंट दिलेल्या नियोजित वेळेप्रमाणे चाचणीकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.