कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. ५ सप्टेंबर २०२० ) खेड तालुका हॉटस्पॉटवर दररोज आढळतात १००+ रुग्ण
खेड तालुक्यात आज ११३ नवीन कोरोना रुग्णांची वाढ,
चाकण शहर व ग्रामीण मध्ये खराबवाडी व खरपुडी खुर्दला सर्वाधिक रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या ३८५६,
२९९८ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
नगरपरिषद हद्दीत ४५, तर ग्रामीण भागात ६८ रुग्णांची वाढ,
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. ५ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज तब्बल नव्याने ११३ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात २८६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ४५, तर ग्रामीण भागात ६८ रुग्णांची भर पडली आहे. नगरपरिषद क्षेत्रात चाकण, तर ग्रामीण भागात खरपुडी खुर्द व खराबवाडीत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ३८५६ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————-