व्हिडीओ : कोरोना रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबवून रुग्णांच्या व्यवस्थेकडे लक्ष द्या : ॲड. किरण झिंजुरके
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : कोरोना रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबवून रुग्णांच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ॲड. किरण झिंजुरके यांनी केली.
कोविड – १९ विषाणूमुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पत्रकार यांची बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद साहेब व सभापती अंकुश राक्षे, पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे, गटविकास अधिकारी अजय जोशी व सर्व पत्रकार यांच्या उपस्थित पार पडली.
प्रतिष्ठाणच्या वतीने ॲड. किरण झिंजूरके यांनी प्रशासनास खडे बोल सुनावले व सांगितले की, तालुक्यातील शासकीय रूग्णालय, तसेच खाजगी रूग्णालये, रुग्णांची गैरसोय, वेळेवर न मिळणारे उपचार, रुग्णांची ने आण करण्यासाठी रुग्णवाहिकेमुळे होणारी अडवणूक आणि मृतदेहांची होणारी हेळसांड व आर्थिक पिळवणूक थांबवावी. तसेच रुग्णांच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी प्रतिष्ठाणच्या वतीने मागणी केली.
याबद्दल आयुष प्रसाद यांनी चिंता व्यक्त करून तातडीने कारभार सुधारण्याचे आदेश दिले. किमान आता तरी प्रशासनाने या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन काम करावे, असे आदेशच दिले. तसेच तहसिलदार सुचित्रा आमले यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय खांडेभराड व कार्याध्यक्ष बाळासाहेब कड व सुनिल कड आदी उपस्थित होते.