भोरच्या पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांचे भोरमध्ये वक्तव्य

महाबुलेटीन नेटवर्क / संतोष म्हस्के
भोर : तालुक्यातील पत्रकार सामाजिक बांधिलकी जपून समाज हिताचे संघाच्या माध्यमातून कार्य करीत आले आहेत. मागील काही वर्षांपासून त्यांचे कार्य जवळून पाहिल्याने भोर तालुका संघातील पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी भोर येथे पत्रकार संघाच्या वतीने सन्मान स्वीकारताना केले.
बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर भोरला मिलिंद मोहिते पहिल्यांदा आल्याने पत्रकारांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. मोहिते पुढे म्हणाले, पत्रकार हे समाजातील चौथा स्तंभ असून समाजाशी निगडित राहून चांगल्या-वाईट कामांची दखल घेण्याचे काम करून समाजाला न्याय देण्याचे काम करतात. यावेळी पोलीस निरीक्षक राजू मोरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सारंग शेटे, पुणे जिल्हा संघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत किंद्रे, पत्रकार विजय जाधव, चंद्रकांत जाधव, संतोष म्हस्के, दत्तात्रय बांदल, इम्रान आतार तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.