Sunday, August 31, 2025
Latest:
भोर

भोर-आंबाडखिंड रस्त्यावरील पूल गायब

अपघाताची शक्यता, सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष
महाबुलेटीन नेटवर्क /संतोष म्हस्के
भोर : तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील भोर-आंबाडखिंड रस्त्यावरील छोटे-मोठे पूल ( मोऱ्या ) यांची दुरावस्था होऊन गायब झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या महत्वाच्या वातुकीच्या मार्गावर अपघात होण्याची शक्यता असल्याचे चित्र आहे.
भोर-आंबाडखिंड हा मार्ग वाई, महाबळेश्वर, पाचगणी, मांढरदेवी या धार्मिक स्थळांना जोडणारा जवळचा मार्ग आहे. हजारो वाहने या मार्गावरून दररोज ये-जा करीत असतात. मात्र रस्त्यावरील लाखो रुपयांचे दिशादर्शक फलक झाड-वेलीत झाकून गेले आहेत तर आठ ते दहा ठिकाणचे ओढ्या-नाल्यांवरील छोटे-छोटे पूल ( मोऱ्या ) नादुरुस्त होऊन ढासळल्या आहेत. यामुळे प्रवाशी व वाहनचालकांना प्रवास करताना अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा संभव असल्याचे वाहांचालकांकडून सांगण्यात येत आहे. गोकवडी येथील उंबरीची ओहळ येथे पुलाचे कठडे अर्धे तुटले असून या ठिकाणी दहा ते पंधरा फूट खोल चारी आहे. तर भाबवडी जवळील पूल तुटल्याने वारंवार येथे दुचाकी स्वरांचे अरुंद पूल असल्याने व पूल पूर्णतः गायब झाल्याने अपघात होत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील गवत-वेलांत झाकलेले दिशादर्शक फलक मोकळे करावेत व दुरावस्था झालेल्या पुलांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!