बारामती मध्ये आज दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह
महाबुलेटिन नेटवर्क
बारामती : मध्ये काल ( दि. २५ ) रोजी घेण्यात आलेल्या ६९ जणांच्या चाचण्यांपैकी ५२ जणांचे अहवाल आज निगेटीव्ह आले आहे, तर दोन जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच १५ जणांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत असल्याची माहिती डॉ. मनोज खोमणे यांनी दिली आहे.
काल ( दि. २५ ) रोजी एकूण ६९ स्वँब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.
बारामती शहरांमधील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये ७८ वर्षाची महिला स्टेशन रोड बारामती येथील, तर ५२ वर्षाची महिला देशपांडे इस्टेट, संघवी पार्क जवळील हरिकृपा नगर येथील आहे.