Saturday, August 30, 2025
Latest:
आदिवासीआंबेगावपुणे जिल्हाप्रादेशिकविशेष

आंबेगाव पंचायत समिती येथील क्रांतिस्तंभावर आद्यक्रांतिकारक होण्या भागू केंगले यांच्या नावाचा समावेश कराण्याची मागणी, लेखी आश्वासनानंतर २५ जानेवारीचे उपोषण मागे…

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
घोडेगाव : पंचायत समिती आंबेगावच्या आवारात असणाऱ्या क्रांतिस्तंभावर असणाऱ्या क्रांतिकारकांच्या नावांमध्ये आद्यक्रांतिकारक लायन हार्टेड होण्या भागू केंगले यांच्या नावाचा समावेश व्हावा, यासाठी बिरसा ब्रिगेड आंबेगाव आणि आदिवासी क्रांती संघटना असाणे यांचा २०१६ पासून पाठपुरावा सुरु असून अद्याप त्यावर कार्यवाही न झाल्याने २५ जानेवारीपासून उपोषण सुरू करण्यात येणार होते. परंतु दि. १९ जानेवारी २०२१ रोजी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेत असल्याची माहिती बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष आदिनाथ हिले यांनी दिली.

नवीन पंचायत समिती समोर सुरु असणाऱ्या क्रांतिस्तंभावर होनाजी केंगले यांच्या नावाचा समावेश व्हावा. यासाठी २०१६ प्रस्ताव सादर करण्यात आला, पण अद्याप त्यावर कार्यवाही न झाल्याने जोपर्यंत होण्या केंगले यांच्या नावावरच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी निर्णय देत नाहीत. तोपर्यंत नवीन क्रांतिस्तंभाचे उदघाट्न करू नये. अन्यथा २५ जानेवारीला बिरसा ब्रिगेड आंबेगाव पंचायत समितीसमोर उपोषणास बसेल, असा इशारा दिला होता. याबाबत दि. ८/१२/२०२० रोजी पंचायत समिती कार्यालयात जाऊन सभापती संजय गवारी यांच्याशी चर्चा करण्यात आलेली होती. तद्नंतर दि. १७/१/२०२१ रोजी पुुणे जिल्हा परिषद मा. उपाध्यक्ष व जि. प. सदस्य विवेक वळसे पाटील यांची भेट घेतली होती. याबाबत १९ जानेवारी २०२१ रोजी सभापती संजय गवारी यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. त्यावेळी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी क्रांतिस्तंभावरील नावाबाबत जोपर्यंत जिल्हाधिकारी निर्णय देत नाहीत, तोपर्यन्त नवीन क्रांतिस्तंभाचे उदघाट्न केले जाणार नसल्याचे लेखी निवेदन दिल्याने २५ जानेवारी रोजी घोषित केलेले उपोषण मागे घेत असल्याचे हिले यांनी सांगितले.

“होनाजी भागूजी केंगले या वीराने बंडाचे निशाण इ. स. १८७४ मध्ये फडकवले. जुलमी सावकारशाही आणि इंग्रजी करप्रणाली याबाबत प्रखर लढा या ढाण्या वाघाने दिला. त्यांना पकडण्यासाठी तेव्हा इंग्रजांनी १ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. १८७६ मध्ये काळ्या पाण्याची शिक्षा होऊन सह्याद्रीमधील हे वादळ थांबवण्याचा प्रयत्न केला.
– प्रवीण पारधी, कार्याध्यक्ष, बिरसा ब्रिगेड आंबेगाव तालुका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!