Saturday, August 30, 2025
Latest:
अपघातइंदापूर

अचानक पेट घेतल्याने टेम्पो जळून खाक,कळाशी गावातील घटना

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
इंदापूर : टेम्पोच्या डॅशबोर्डमधून अचानक धूर येवून जाळ आल्याने टेम्पो जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.२७ जुलै) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कळाशी (ता.इंदापूर) गावच्या हद्दीत सूर्यवंशीवस्ती नजीक घडली.प्रसंगावधान राखून टेम्पोचालक व त्याच्या सहका-याने टेम्पोतून उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले.
 या संदर्भात टेम्पोचालक राहुल भास्कर सुपाते (रा.वांगी,ता.उत्तर सोलापूर,जि.सोलापूर) याने इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.पोलीस ठाण्याच्या जळीत नोंदवहीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
  सविस्तर हकीकत अशी की,टेम्पोचालक सुपाते हा रवींद्र गजानन भालेराव (रा.खराबवाडी, चाकण) यांच्या अशोक लेलंड टेम्पो(क्र.एम एच १४जीडी ८६९ ८) वर चालक म्हणून काम करतो.सोमवारी (दि.२७ जुलै) तो व त्याचा मित्र सतीश भानुदास सूर्यवंशी (रा.सूर्यवंशीवस्ती, कळाशी,ता.इंदापूर) हे दोघे त्या टेम्पोमधून सोलापूरमधून पुण्याकडे निघाले होते.वाटेत टेंभुर्णी(जि.सोलापूर) व इंदापूरात डोंगराई सर्कलजवळ या ठिकाणी टेम्पो बंद पडला.त्यामुळे सूर्यवंशी याच्या घरी मुक्काम करुन सकाळी पुण्याला जाण्याच्या हेतूने सुपाते हा सूर्यवंशीच्या घरी टेम्पो घेवून जात असताना सूर्यवंशवस्तीच्या अलिकडे टेम्पोच्या डॅशबोर्डमधून अचानक धूर येवू लागला.प्रसंगावधान राखून त्या दोघांनी टेम्पोतून खाली उडी मारली.तेवढ्यात टेम्पोच्या केबीनने पेट घेतला. काही वेळात टेम्पो जळून खाक झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!