निमगावकरांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बेलभंडारा कुरीयरने दिल्लीला रवाना….
निमगावकरांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बेलभंडारा कुरीयरने दिल्लीला रवाना….

महाबुलेटीन न्यूज
दावडी निमगाव ( पुणे ) : निमगांव ( ता. खेड ) येथील ग्रामस्थांच्या वतीने केंदीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी खंडोबा देवस्थान व परिसर विकासासाठी ५६ कोटी रुपये मंजुर केल्याबद्दल गडकरी साहेब व निमगावचे सुपुत्र IAS संकेत भोंडवे यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांनी खंडेरायाची बेल भंडाराने तळी भरुन खंडेरायाचा मानाचा प्रसाद म्हणुन गडकरी साहेबंना बेलभंडारा कुरीयने दिल्लीला रवाना करण्यात आला. सोबत ग्रामपंचायत व देवस्थानच्या वतीने आभार पत्र पाठवण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, समर्थ फांऊडेशनचे अध्यक्ष ॲड. विजयसिंह शिंदे पाटील, मा. सरपंच बी टी शिंदे, मा. सरपंच बबनराव शिंदे, खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष बबनराव शिंदे, भाऊसाहेब तांबे, उपसरपंच संतोष शिंदे, संभाजी शिंदे, युवराज शिंदे, भगवानराव शिंदे, दिलीप भगत, तुकाराम भोंडवे, निलेश राऊत, काळुराम वायकर, किसन रांजणे, महेश शिंदे, विक्रम काळे, संदिप शिंदे, अमोल शिंदे, राहुल शिंदे, माऊली शिंदे आदी ग्रामस्थ कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित होते.
—–