रणझुंजार फाऊंडेशनच्या वतीने चाकण पोलिस स्टेशनमध्ये महिला दिन साजरा…
रणझुंजार फाऊंडेशनच्या वतीने चाकण पोलिस स्टेशनमध्ये महिला दिन साजरा…
महाबुलेटीन न्यूज : कल्पेश भोई
चाकण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रणझुंजार फाऊंडेशन यांच्या वतीने चाकण पोलिस स्टेशन येथील सर्व पोलीस महिला कर्मचारी यांना मास्क व पेन भेट देऊन केक कापून महिलादिन साजरा करण्यात आला.
सध्या जगावर ओढवलेल्या या कोरोना महामारीतही समाजाची अहोरात्र सेवा करणारे सर्व महिला पोलिस कर्मचारी यांचे यानिमित्ताने मनोबल वाढविण्यासाठी व त्यांच्या मातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व यांचा संगम असलेल्या या महिलांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने चाकण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस हवालदार स्वाती जाधव, देवयानी सोनवणे, सुनंदा म्हसे, उज्वला घनवट, अर्चना मलगे यांच्यासह सर्व पोलिस महिला कर्मचारी तसेच रणझुंजार फाऊंडेशनचे संस्थापक अशोकभाऊ बोचरे, अध्यक्ष संतोष जमदाडे, उपाध्यक्ष राहुल क्षिरसागर, खजिनदार वाल्मिक दौंडकर, कार्याध्यक्ष जितेंद्र सोनवणे, संघटक विशाल घाडगे, सतिश शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा कोरोनाचे नियम पाळून घेण्यात आला.