प्रसिद्ध बैलगाडा मालक हभप. शांताराम जाधव यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते व पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक शांताराम यशवंत जाधव ( वय ६२ वर्षे ) यांचे आज ( दि. १६ जानेवारी ) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ, बहीण, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. युवा कार्यकर्ते रुपेश जाधव यांचे ते वडील, तर सामाजिक कार्यकर्ते नवनाथ जाधव व माजी उपसरपंच संदीप जाधव यांचे ते बंधू होत.