श्री शिवाजी विद्यामंदिर व सि. भि. पाटोळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रचार्यपदी प्रा. सुभाष गारगोटे यांची नियुक्ती
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खेड तालुक्याचे सुपुत्र व जनता शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा. सुभाष गारगोटे यांची श्री शिवाजी विद्यामंदिर व सि. भि. पाटोळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गारगोटे हे सन 1985 पासून जनता शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी 1998 पासून सलग अकरा वर्ष जनता शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे सेवक सहकारी पतसंस्थेवर सचिव म्हणून वेगळा ठसा उमटविला असून भ्रष्टाचार मुक्त कारभाराची परंपरा जपली आहे.
1994 मध्ये त्यांची राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी म्हणून निवड झाली. ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी कामठी नागपूर येथे यशस्वी प्रशिक्षण प्राप्त अधिकारी असून ते सध्या चीफ ऑफिसर पदावर कार्यरत आहेत.
सन 2006 साली त्यांची संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल पदावर संचालक म्हणून निवड झाली. 2012 साली जनता शिक्षण संस्थेच्या सहसचिव पदावर कार्यरत झाले, तर 2016 ते आज तागायत त्यांची जनता शिक्षण संस्थेच्या सर्वोच्चपदी जनरल सेक्रेटरी म्हणून यशस्वी कारकीर्द आहे.