राठी उद्योग समुहा तर्फे कोविड योद्ध्यांचा सन्मान
राठी उद्योग समुहा तर्फे कोविड योद्ध्यांचा सन्मान
महाबुलेटीन न्यूज
आळंदी / प्रतिनिधी : येथील राठी उद्योग समुहाचे वतीने लॉकडाउन कालावधीत कंपनीचे आस्थापणात बिकट परिस्थितीत सुरक्षा विभागातील अतिसंवेदनशील विभागात कार्यरत राहून सुरक्षात्मक जबाबदारीचे काम निर्भयपणे पार पाडणार्या विविध कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना कोविड १९ योद्ध्यांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.
यावेळी मानवी संसाधन व प्रशासन राठी उद्योग समूहाचे उपाध्यक्ष श्रीकूमार दंडपाणी यांचे हस्ते कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शरद राऊत, महेंद्रकुमार फणसे, महेरेश कुलकर्णी, डॉ. पडवळ, श्री. जोर्जे, विजय आल्हाट, संपतलाल यादव, दत्तात्रय घावरे, ज्ञानेश्वर शेखर, गणेश वाघमारे, गणेश तावरे आदी उपस्थित होते.