Friday, April 18, 2025
Latest:
खेडगुन्हेगारीपुणे जिल्हामहाराष्ट्रराष्ट्रीयविशेष

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज… अंमली पदार्थ विरोधी पथकाची खेड तालुक्यातील शेलपिंपळगावमध्ये मोठी कारवाई… तब्बल वीस कोटींचे अंमली पदार्थ जप्त…

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण, दि. ८ ऑक्टोबर 2020 : विक्रीसाठी आणलेले २० कोटी रूपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) हे अंमली पदार्थ चाकण व पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यातील शेल पिंपळगावमध्ये जप्त केले आहे. याप्रकरणी बुधवारी (दि.७) दुपारी ही कारवाई केली असून पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

चेतन फक्कड दंडवते (वय २८, रा. मलठण-आंबेवस्ती, ता. शिरुर, जि. पुणे) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय २५, रा. रुईखेडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव. सध्या रा. अकोले, बाबुरावनगर, बाफना मळा, शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे ), अक्षय शिवाजी काळे (वय २५, रा. पाचर्णे मळा, ता.शिरुर, जि. पुणे), संजिवकुमार बन्सी राऊत (वय ४४, रा. सेक्टर १२ बी, बुकारोस्टील सिटी, झारखंड, सध्या रा. सेक्टर २०, नोएडा, उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय ३१, रा. गंगोई, पो. लालुछाप्रा, थाना पारु, जि. मुजफ्फरनगर. सध्या रा. सदरपुर, सोमबाजार, सेक्टर ४५, नोएडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांनी बुधवारी (दि. ७) याबाबत चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जण अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी शेलपिंपळगाव येथे येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी सापळा लावून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून २० कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची कार, रोख २३ हजार १०० असा एकूण २० कोटी पाच लाख २३ हजार १०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस पथकाचा अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान आज याबाबद्दल पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यलयाचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यावर मोठा खुलासा करणार असून अमली पदार्थाच्या गुन्ह्या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. अमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांनी माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!