कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २७ ॲागष्ट २०२० )- धक्कादायक : खेड तालुक्यात दैनंदिन रुग्णांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर, तालुक्यात आज तब्बल ९९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, ऍक्टिव्ह रुग्णांनी केला ५०० चा टप्पा पार, एकूण रुग्णांची संख्या २८२१
कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २७ ॲागष्ट २०२० )
चाकण, आळंदी, राजगुरूनगरला सर्वाधिक रुग्ण, नगरपरिषद हद्दीत ४४, तर ग्रामीण भागात ५५ रुग्णांची वाढ, तीन जणांचा मृत्यू, २२४० रुग्ण बरे होऊन गेले घरी,
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. २७ ऑगस्ट ) : खेड तालुक्यात आज तब्बल नव्याने ९९ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून वाजवणे, आळंदी व राजगुरूनगर येथील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात २२४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ४४ तर ग्रामीण भागात ५५ रुग्णांची भर पडली आहे. राजगुरूनगर, चाकण, आळंदी, वडगाव घेनंद व खराबवाडीत सर्वाधिक रुग्ण आढळले असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २८२१ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४४ ) : राजगुरूनगर – १८, चाकण – १२, आळंदी – १४,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ५५ ) : वडगाव घेनंद ८, खराबवाडी ७, मांजरेवाडी ४, काळुस ३, मेदनकरवाडी ३, मरकळ ३, निघोजे ३, वाकी बुद्रुक ३, अहिरे २, कुरुळी २, मोई २, वासुली २, तर चिंबळी, दोंदे, गुळाणी, होलवाडी, काळेचीवाडी, केळगाव, शेलगाव, शेलपिंपळगाव, राक्षेवाडी, रासे, रेटवडी, सातकरस्थळ, वाजवणे या १३ गावात प्रत्येकी १ रुग्ण.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ९९
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २८२१
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ७२
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ५0९
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – २२४०
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – १८, चाकण – १२, आळंदी – १४, वडगाव घेनंद – ८, खराबवाडी – ७
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०३ ( १ पुरुष, वय ७६, रा. वाजवणे, १ पुरुष, वय ७७, रा. आळंदी, १ महिला, वय ५७, रा. राजगुरूनगर )
————