महाबुलेटीन BREAKING : भोसरीत सिलेंडरचा स्फोट : १ ठार
आमदार महेश लांडगे यांची घटना स्थळाला भेट
महाबुलेटीन न्यूज / विशेष प्रतिनिधी
भोसरी :दिघी रोड येथील महादेव नगर कॉलनी मध्ये सकाळी ६ वाजता च्या दरम्यान झालेल्या सिलेंडर स्फोटात १ जण मृत्युमुखी व १३ जण जखमी झाले आहेत. याविषयी माहिती मिळताच आमदार महेश लांडगे घटना स्थळी हजर झाले होते.
सदर वर्दी प्राप्त होतात भोसरी अग्निशमन केंद्राचे एक व मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी या ठिकाणची दोन अग्निशमन वाहने एकूण तीन अग्निशमन वाहने घटनास्थळी त्वरित रवाना करण्यात आली घटनास्थळी अग्निशमन दलाच्या प्रथमदर्शी अहवालातून निरीक्षणातून असे दिसून आले की घरगुती एलपीजी गॅस रात्रभर गळती होऊन तो घरभर पसरल्याने त्याचा सकाळी स्पार्क मिळताच स्फोट झाला असावा, ज्यामध्ये फ्लॅट क्रमांक 102 व 103 या घरांच्या तीन भिंती व खिडक्यांना हादरा बसून कोसळल्या व हानी झाली.
खेड विभागातील ( खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर ) आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याघटनेत दोन घरातील एकूण 13 व्यक्ती जखमी झाले आहेत यामध्ये तीन पुरुष तीन महिला दोन लहान मुल आणि पाच लहान मुली असे एकूण 13 जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक लोकांनीच त्वरित डी वाय पाटील रुग्णालयात हलविले होते.
जखमी व्यक्तींची नावे
1)श्री ज्ञानेश्वर टेमकर वय 32 वर्षे
2)सौ मंगला टेमकर वय 27 वर्ष
3)कु. अनुष्का टेमकर वय 7वर्ष
4)कु. यशश्री टेमकर 3 वर्ष
5)श्री सातपुते
6)सौ सातपुते
व त्यांची 7)मुलगा व 8)मुलगी
सातपुते कुटुंबीय श्री टेमकर यांच्याकडे आलेली पाहुणे होती ज्यांची पूर्ण नाव समजू शकली नाही,
9) श्री महेंद्र सुरवाडे वय 40 वर्ष
10)सौ अर्चना सुरवाडे वय 35 वर्ष
11)कु.आकांक्षा सुरवाडे वय15 वर्ष
12) कु.दीक्षा सुरवाडे वय 13 वर्ष
13) कु.अमित सुरवाडे वय 8 वर्ष
असे एकूण 13 व्यक्ती जखमी झाल्याचे प्रथमदर्शी अहवालात अग्निशमन दलाला कडून नमूद करण्यात आले आहे.
हा स्फोट इतका भीषण होता कि इमारतीच्या भिंती कोसळल्या आहेत, तसेच आजूबाजूला १०० मीटर च्या परिसरातील घरांच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या आहेत.

हा स्फोट कसा झाला या बाबत अग्निशमन दल आणि पोलीस अधिक तपास करत आहेत, या इमारती मधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. तसेच सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन आमदार लांडगे आणि प्रशासनाने केले आहे.
घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आमदार लांडगे यांच्या समवेत नगरसेवक सागर गवळी,विकास डोळस,अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.