शून्यातून विश्व निर्माण करणारा उद्योजक हरपला…
उद्योगपती संजय कौटकर यांचे निधन
महाबुलेटिन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : येथील गोसावीबाबा कंस्ट्रक्शनचे संचालक, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर, उद्योजक संजय रामचंद्र कौटकर ( वय ५० वर्षे ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, चुलते, पुतणे असा मोठा परिवार आहे. उदयोजक अशोक व राजेंद्र कौटकर यांचे ते बंधू, उदयोजक चेतन व गणेश कौटकर यांचे ते वडील, तर उद्योजक संतराम कौटकर यांचे ते पुतणे होत.
त्यांच्या निधनाने सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेली २० ते २५ वर्षे ते कन्स्ट्रक्शन क्षेत्रात असून त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. प्रगतशील शेतकरी, पीसीएमसी वाहक ते उदयोजक असा असा त्यांचा प्रवास थक्क करणारा असून त्यांनी एकत्र कुटुंबाला सोबत घेऊन खडतर प्रवास करून शासकीय नोकरीवर पाणी सोडून व्यवसायात पदार्पण केले व अल्पावधीत या व्यवसायात त्यांनी आपले नाव कमावले. माजी आमदार नारायणराव पवार, माजी आमदार सुरेशभाऊ गोरे व विद्यमान आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या कारकिर्दीत त्यांनी खेड तालुक्यात रस्त्यांची दर्जेदार विकासकामे केली.