Sunday, August 31, 2025
Latest:
निवड/नियुक्तीपुणेशैक्षणिक

खेडचे माजी आमदार ॲड. राम कांडगे यांची रयतच्या पश्चिम विभागीय चेअरमनपदी चौथ्यांदा निवड

माजी आमदार ॲड. राम कांडगे

महाबुलेटीन नेटवर्क / हनुमंत देवकर

चाकण : आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षात संस्थेच्या पश्चिम विभागीय सल्लागार समितीचे चेअरमनपदी खेड तालुक्याचे माजी आमदार ॲड. राम कांडगे यांची सलग चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे.
ही निवड संस्थेचे अध्यक्ष खा. शरदरावजी पवार यांचे अध्यक्षतेखाली व संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, कामगारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत झाली. ॲड. राम कांडगे यांच्या सलग चौथ्यांदा झालेल्या निवडी बद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत असुन त्यांच्या या निवडीबद्दल त्यांनी संस्थेच्या वरील पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे. या विभागात विनाअनुदान तत्वावर उच्च माध्यमिक विज्ञान शाखा, इंग्रजी माध्यम शाळा, संगणक, माध्यमिक स्तरावर व्यवसायाभिमुख शिक्षण व आय टी आय हे शैक्षणिक उपक्रम सुरु केलेले असुन अलीकडच्या कोरोना साथीच्या काळात विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान टाळणे करिता ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरु केलेली असुन यामध्ये या विभागातील दुरवरच्या डोंगरी आदिवासी दुर्गम व ग्रामीण भागातील बहुसंख्य म्हणजे जवळ जवळ ७०% विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम सुरु केलेली ‘ऑनलाईन शिक्षण’ पद्धती
ब-यापैकी यशस्वी झाल्याचे चित्र असुन या सर्व शैक्षणिक कार्यात संस्थेचे अध्यक्ष खा. शरदरावजी पवार यांचे नेतृत्व व संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य ना. अजितदादा पवार व ना. दिलिपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे ठरलेले आहे अशी भावना ॲड. राम कांडगे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!