खेडने ओलांडला चारशेचा टप्पा;तालुक्यात गेला नववा बळी
महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर : कोरोना महामारीचे संकट अधिक गडद होत चालले आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा चारशे पार झाला आहे. काल रात्री तालुक्यातील नवव्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला.खेड तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णावर वायसीएम या पिंपरीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरु असताना श्वसनाचा त्रास वाढून त्या रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला. अठ्ठावन्न वर्ष वय असलेली ही व्यक्ती दावडी येथील होती. मृत्यूबाबत माहिती पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. सध्या शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आज रात्री पासून पुढील दहा दिवस अत्यावश्यक सेवा वगळता दहा दिवस कडक लॉकडाऊन होणार आहे.
कोरोना खेड तालुक्यात
रुग्णांची संख्या ४०७
मृत्यू ९
कोरोनवर मात १३६