शरद पवार यांच्या प्रयत्नातून, कोरोनावर प्रभावी ठरणारी रेमडेसिविर औषधी ससूनला सुपूर्द
गरीब रुग्णांवर होणार मोफत उपचार,जेष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रयत्नातून काही कंपन्यांनी दिला सीएसआर फंड
महाबुलेटीन नेटवर्कपुणे : ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे काही कंपन्यांकडून सार्वजनिक दायित्व निधीतून ( सीएसआर फंड )
200 रेमडेसिवीर उपलब्ध झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोनावर प्रभावी ठरणारी ही औषधी ससून सर्वोपचार रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आली असून याचा उपयोग गरीब रुग्णांवर मोफत केला जाणार आहे, असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

