आनंदाची बातमी : महाळुंगे कोविड सेंटरमधून तेरा रुग्ण बरे होऊन घरी
महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
चाकण : कोरोनाचा चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वाढत्या रुग्णांसाठी चाकणजवळील म्हाळुंगे येथे म्हाडाच्या इमारती मध्ये कोविड सेंटर ची उभारणी करण्यात आली होती. १४०८ बेडचे हे रुग्णालय कोरोना महामारीवर रुग्णांसाठी सज्ज आहे. येथून तेरा रुग्ण व्यवस्थित उपचार घेऊन घरी परतले आहेत.
या कोविड रुग्णालयात सध्या जुन्नर, आंबेगाव , खेड येथील रुग्णांवर उपचार सुरू असून या रुग्णालयातील १३ कोविड संसर्गित व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयात नियमित होणारा व्यायाम, आहार, उपचार तसेच वेगवेगळ्या उपक्रमांतून तसेच डॉकटर , नर्स यांच्या अथक प्रत्नांनंतर कोरोनाग्रस्त व्यक्तींना सुखरूप घरी पोहचवण्यास मदत झाली आहे. सर्व स्तरांतून येथील कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागात आता कोरोना ने शिरकाव केल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले आहे.
या कोविड सेंटरमधून तेरा रुग्णांना घरी पाठविण्यात आले त्यावेळी पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे,गट विकास आधिकारी अजय जोशी, तालुका वैद्यकिय आधिकारी डॉ. सुरेश गोरे, डॉ.अवधुत डेरे व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थितीत होते.