Thursday, April 17, 2025
Latest:
क्रीडापर्यटनपश्चिम महाराष्ट्रपुणेपुणे जिल्हापुणे शहर विभागप्रादेशिकमहाराष्ट्रयशोगाथाविशेषशैक्षणिक

तापाने फणफणलेल्या पुण्यातील दहा वर्षाची चिमुकली ईराकडून एव्हरेस्ट बेस कॅम्प शिखर पादाक्रांत…

तापाने फणफणलेल्या पुण्यातील दहा वर्षाची चिमुकली ईराकडून एव्हरेस्ट बेस कॅम्प शिखर पादाक्रांत

महाबुलेटीन न्यूज

पुणे : पुण्यामधील इरा सचिन गायकवाड या दहा वर्षाच्या इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या मुलीने नुकतेच एव्हरेस्ट बेस कॅम्पशिखर यशस्वीपणे चढाई केली.

इराने तिच्या आईवडिलांसोबत १३ मे रोजी लुकाला इथून एवरेस्ट बेस्ट साठी प्रस्थान केले. सलग आठ दिवस रोज चढाई केल्यानंतर ती २० मे रोजी 5364 मीटर उंच एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहचली.

इरा सचिन गायकवाड ही पुण्यातील सेंट अर्नाल्ड सेंट्रल स्कूल वडगाव शेरी येथे पाचवी मध्ये शिकत आहे. तिने या आधीही पश्चिम महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर पण तिने आई समवेत अनेकदा यशस्वीपणे चढाई केलेली आहे.

20 मे 2023 ला इराच्या अंगात 101 ताप होता, ऑक्सिजन लेव्हल 60 झाली होती, पण तिने जिद्दीने समिट केला. त्या दिवशी अंगातथंडी मुळे 5 लेअर्स घातले होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!