आई-वडिलांच्या स्मरणार्थ भंडारा डोंगरावरील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिरासाठी १ लाखांचा धनादेश, खराबवाडीचे माजी उपसरपंच काळुराम केसवड व परिवाराकडून मंदिरासाठी देणगी प्रदान
आई–वडिलांच्या स्मरणार्थ भंडारा डोंगरावरील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिरासाठी १ लाखांचा धनादेश,
खराबवाडीचे माजी उपसरपंच काळुराम केसवड व परिवाराकडून मंदिरासाठी देणगी प्रदान
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी गावचे माजी उपसरपंच, उद्योजक काळुराम केसवड यांनी वडील कै. तुकाराम पांडु केसवड व आई कै. गं. भा. गऊबाई तुकाराम केसवड यांचे स्मरणार्थ एक लाख रुपयांचा धनादेश जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरासाठी वडिलांच्या पुण्यस्मरणदिनी हभप. पंकजमहाराज गावडे यांचेकडे सुपूर्द केला.
या प्रसंगी माजी उपसरपंच, उद्योजक प्रकाशभाऊ खराबी, भैरवनाथ सोसायटीचे माजी चेअरमन कांताराम कड, अनंतकृपा पतसंस्थेचे माजी चेअरमन सोपानराव खराबी, हनुमान दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष साहेबराव कड, सचिव बाळासाहेब खराबी, संचालक मधुकर कड, नंदाराम खराबी, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर, उद्योजक विक्रम केसवड, अर्जुन केसवड, हर्षवर्धन केसवड, स्वराज गव्हाणे आदी उपस्थित होते.
माघ शुद्ध दशमी दिनी हभप. गावडे महाराज यांचे किर्तन श्रवण केल्यावर काळूराम केसवड यांनी भंडारा डोंगरावरील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिरासाठी १ लाखांचा मदत निधी देण्याचा केलेला संकल्प केसवड परिवाराने वडिलांच्या पुण्यस्मरण दिनी पूर्ण केला.
0000