शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत विकास पॅनेलने उडविला परिवर्तन पॅनेलचा धुवा
महाबुलेटीन न्यूज
चाकण : शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण या पतसंस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये अनुक्रमे विकास पॅनल आणि परिवर्तन पॅनल असे दोन पॅनल व अपक्ष या मध्ये मतदान झाले.
मतदान प्रक्रिया पारपडली असता विकास पॅनलने १२/० अशी बाजी मारली. इतर मागास प्रवर्गामधुन मधुकर नाईक, सर्वसाधारण प्रवर्गामधुन मधुन अविनाश कड, विजय पवार, राजेंद्र चौधरी, बाळासाहेब मुळे, विलास आदलिंग, संतोष काळे, पांडुरंग घेनंद, सरिता घोरपडे, एकनाथ टोपे, नंदकुमार शेलार, अनुसूचित प्रवर्गामधुन प्रशांत आव्हाड हे बारा उमेदवार बहुमताने विजयी झाले. एकुण १५ सभासद असुन भटक्या जाती प्रवर्गातुन हरिदास देवकते, महिला वर्गातून प्रीती खराबी, अंजली शेरकर यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे विरोधी पॅनलने निवडणूक प्रचारा दरम्यान अपप्रचार करुन सुध्दा सुजान मतदारांनी विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडून दिले.
विकास पॅनलला भरघोस मतदान करुन सर्व शिक्षक सेवकांचे आभार व्यक्त करताना विकास पॅनलचे प्रमुख मधुकर नाईक यांनी सांगितले कि, ही संस्था शुन्यातुन उभी राहीलेली असुन या संस्थेमध्ये कोणताही गैरप्रकार होत नाही. ही संस्था एकमेकांच्या सहकार्यावर चालली आहे. शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण सहाय्यक निबंधकांचा ‘अ’ दर्जा प्राप्त झालेला आहे. आपण आम्हास निवडून देऊन आमच्या सर्व उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हाच आमचा खरा विजय आहे.
पतसंस्थेमधील सर्व मतदारांचे सर्व विजयी उमेदवारांनी आभार मानले. शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेची प्रगती उत्तरोत्तर उंच भरारी घेईल याची सर्व विजयी उमेदवारांनी ग्वाही दिली. तालुक्यातील सर्व स्तरावरून विजयी उमेदवारांचे कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
