द्वारका स्कुलच्या विद्यार्थ्यांची महाळुंगे पोलीस चौकीला भेट
महाबुलेटीन न्यूज
महाळुंगे इंगळे : येथील द द्वारका स्कूल मधील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून म्हाळुंगे पोलीस चौकीला भेट दिली. पोलिसांनी मुलांना शस्त्रांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रदिप गायकवाड यांनी मुलांना पोलीस चौकीचे कामकाज आणि विविध प्रकारच्या बंदुकांची माहिती दिली. मुलींना स्वतःची सुरक्षा कशी करता येईल, तसेच सायबर गुन्हे कसे घडतात या विषयी मुलांना मार्गदर्शन केले.
हे शस्त्रास्त्र पाहून विद्यार्थी खूप आनंदी झाले. त्यांनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले. काही विद्यार्थ्यांनी पोलीस दलात कसे रुजू होता येईल याबाबत प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. याबाबत गायकवाड यांनी त्यांना सखोल मार्गदर्शन केले. पोलिस चौकी मार्फत मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस हवालदार संपत मुळे, शाहनवाज मुलाणी यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.