जागतिक मधुमेह दिनानिमित्त प्रॅश डायबेटीस केअर व हॉस्पीटलच्या वतीने रविवारी ‘निरोगी आरोग्य जागरुकता अभियाना’चे आयोजन…
जागतिक मधुमेह दिनानिमित्त प्रॅश डायबेटीस केअर व हॉस्पीटलच्या वतीने रविवारी ‘निरोगी आरोग्य जागरुकता अभियाना’चे आयोजन…
महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
चाकण : जागतिक मधुमेह दिनानिमित्त प्रॅश डायबेटीस केअर व हॉस्पीटल, चाकण आणि वेलकेअर सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निरोगी आरोग्य जागरुकता अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. चाकण येथील श्रेया लॉन्समध्ये रविवार, दिनांक १४ नोंव्हेबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. निलेशजी लंके यांच्या हस्ते या अभियानाचे उदघाटन होणार असून या कार्यक्रमासाठी शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. अमोलजी कोल्हे, शिवसेनेचे उपनेते माजी खासदार श्री. शिवाजीदादा आढळराव पाटील, खेड तालुक्याचे आमदार श्री. दिलीपरावजी मोहिते पाटील, जुन्नर तालुक्याचे आमदार श्री. अतुलजी बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे तसेच खेड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या निरोगी आरोग्य जागरुकता अभियान उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रशांत शेलार (खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध मधूमेह तज्ञ), डायरेक्टर-प्रॅश डायबिटीज हाॅस्पिटल, चाकण व वेलकेअर सुपरस्पेशलिटी हाॅस्पिटल, नारायणगाव यांनी केले आहे.
००००