Wednesday, April 16, 2025
Latest:
निवड/नियुक्तीपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमीडियाविशेषसोशल मीडिया

सागर पवार यांची पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या मीडिया सेल प्रमुख पदी निवड..

सागर राजेंद्र पवार यांची पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या मीडिया सेल प्रमुख पदी निवड..

महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : एकेकाळी ग्राहक हा बाजारपेठेचा राजा समजला जात होता परंतु आज सर्वच बाजूने त्याची पिळवणूक होताना दिसत आहे. ग्राहकांच्या फसवणुकीच्या तक्रारी भरमसाठ प्रमाणात वाढ होत आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी व ग्राहकांनी वेळोवेळी सतर्क राहण्याच्या जनजागृतीच्या कार्याला सागर पवार हे नक्कीच मीडियाद्वारे वाचा फोडतील यामुळे ग्राहकांचा नक्कीच फायदा होऊन फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल असा विश्वास संपादन करीत राष्ट्रीय सचिव अरविंद धुळेकर, तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील ढमाळ यांनी श्री सागर राजेंद्र पवार यांना मिडिया सेल पुणे जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्याचे पत्र देण्यात आले.

सागर राजेंद्र पवार हे अनेक वर्ष मीडियामध्ये सक्रिय असून त्यांनी आत्तापर्यंत अनेक वृत्तवाहिनी दैनंदिन पेपर व साप्ताहिक मध्ये आपले कौशल्य पणाला लावून आपल्या कार्याचे दाखले दिलेले आहेत. ग्राहकांना नक्कीच यांच्या बातम्यांमुळे न्याय मिळेल असा ग्राहक संरक्षण परिषदेस विश्वास वाटतोय.

सागर पवार यांच्या माध्यमातून ग्राहक जनजागृतीचे कार्य केले जाईल, यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील ढमाळ यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस यशस्वी शुभेच्छा देत ही निवड सार्थ असल्याचे म्हटले आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!