कोरोना अपडेट खेड तालुका : आज ३५ कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या १०५२
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज एका दिवसात नव्याने ३५ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या १०५२ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २३ ) : राजगुरूनगर – १०, चाकण – ९, आळंदी – ४,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण १२ ) : चऱ्होली खुर्द ३, सोळू २, शेलगाव, केळगाव,
चिंबळी, कडाचीवाडी, मेदनकरवाडी, निघोजे व पिंपरी बुद्रुक या सात गावात प्रत्येकी १
# आजची एकूण रुग्ण संख्या – ३५
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १०५२
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १८
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४३२
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ६०२
# आज सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – १०, चाकण – ९
# आज मयत झालेली व्यक्ती : ०