Wednesday, April 16, 2025
Latest:
कोरोनापुणे

पुणे जिल्हा कोरोना अपडेट : जिल्ह्यात 20 हजार 545 ॲक्टीव रुग्ण

पुणे जिल्ह्यात 36 हजार 27 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : जिल्हयात एकूण 58 हजार 27 रुग्ण कोरोना बाधित असून त्यापैकी 36 हजार 27 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 20 हजार 545 इतकी असल्याची
माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 14 हजार 748,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 813,
पुणे कॅन्टोंन्मेंट 257,
खडकी विभागातील 46,
ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 581,
जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 100 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात आता पर्यंत मृत्यू झालेल्या कोरोना बधितांची एकूण संख्या : 1 हजार 455
यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 61,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 236,
पुणे कॅन्टोंन्मेंट 29,
खडकी विभागातील 27,
ग्रामीण क्षेत्रातील 68,
जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 34 रुग्णांचा समावेश आहे.
तसेच 593 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.09 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.51 टक्के इतके आहे.
( टिप :- दि. 22 जुलै 2020 रोजी दुपारी 03 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!