Tuesday, July 8, 2025
Latest:
कोरोनाखेडविधायक

युवक आले  रक्तदानासाठी पुढे

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर: यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे. प्रतिवर्षी गणेशोत्सव वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करणाऱ्या पानमंदवाडी येथील आदिनाथ गणेश मित्र मंडळ व बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी
कोरोनाच्या संकटकात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असताना अवाजवी खर्चाला फाटा देऊन पुढाकार घेऊन दुसऱ्याला जीवनदान देणाऱ्या रक्तदान या पवित्र कार्यासाठी आपण सदैव उभे असून संकटकाळात पुढे येण्याचा संकल्प व्यक्त केला.
सकाळी ९ वाजता रक्तदानाला सुरवात होऊन सायं. ६ वाजेपर्यंत सुरू होते. सर्व रक्त दात्यांना डोनर प्रमाणपत्र त्याक्षणी देण्यात येत होते. शिबिरासाठी  पिंपरी चिंचवड रक्तपेढीचे डॉ.भरत चौधरी आणि त्यांचे सहकारी डॉ.समीर जमादार,डॉ.स्वप्निल मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ गणेश मित्र मंडळ ,पानमंदवाडीआणि बजरंग दल खेड प्रखंड यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल रुखिमीनी कीर्तन मंडपमध्ये संपन्न झाला .
कोरोनाच्या संकटकाळामध्ये पानमंदवाडी,शेंडेवाडी,ठाकरवाडी आणि कडूस मधील युवकांनी घराबाहेर पडून रक्तदानासारख्या पवित्र कार्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असा आदर्श पुढील पिढीसाठी घालून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!