युगप्रवर्तक प्रतिष्ठानच्या वतीने संविधान दिन
महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील युगप्रवर्तक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा संविधान सन्मान दिनाचा कार्यक्रम या वर्षी २७ नोव्हेंबर २०२० रोजी ऑनलाइन होणार असल्याची माहिती युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौतमराव खरात यांनी दिली.
दरवर्षी २६ नोव्हेंबर या दिवशी आंबेगाव तालुक्यात दरवर्षी घोडेगाव शहरात संविधान सन्मान रॅलीचे आयोजन केले जाते व संविधान या विषयावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन तसेच दरवर्षी या दिवशी १०० संविधानाच्या प्रती अधिकारी व नागरिकांना देण्यात येऊन प्रसिद्ध व्याख्यात्यांच्या माध्यमातून संविधानावर जनजागृती म्हणून व्याख्यान दिले जाते. परंतु या वर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे प्रशासनाने घालून दिलेले सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी हा कार्यक्रम ऑनलाइन पध्दतीने करण्यात येणार असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, संविधान हा राष्ट्रग्रंथ असून प्रत्येक भारतीय नागरिकांच्या घरात तो असला पाहिजे.
सर्वांनी संविधानाचे पूजन घरीच करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे करावे. संविधानाच्या विषयी जनजागृती व्हावी म्हणून या वर्षी हा कार्यक्रम युगप्रवर्तक प्रतिष्ठानच्या वतीने ऑनलाइन घेण्यात आला असून युगप्रवर्तक प्रतिष्ठाणच्या अधिकृत फेसबुक वरून दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता आंबेडकर चळवळीचे अभ्यासक, दैनिक पुण्यनगरीचे स्तंभ लेखक व निर्णायक एल्गारचे संपादक दादाभाऊ अभंग हे ऑनलाइन येऊन संविधान सरनामा या विषयावर व्याख्यान देणार असून या सुवर्ण संधीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा व कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन युगप्रवर्तक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.