Sunday, August 31, 2025
Latest:
आंबेगावआरोग्यकोरोनाविशेष

सकारात्मक: ‘या’साठी मंचर ही देशातील पहिली ग्रामपंचायत !?

महाबुलेटिन नेटवर्क
मंचर : जीवरक्षक प्रणालीने सुसज्ज असणारी अत्याधुनिक रुग्णवाहिका घेणारी मंचर ही देशातील पहिली ग्रामपंचायत ठरू शकते. वीस लाखांची तरतूद मंचर ग्रामपंचायतीने केली आहे. लवकरच ही ऍम्ब्युलन्स गरजूंसाठी उपलब्ध होणार आहे.
        कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गरज लक्षात मंचरकरांनी  एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आंबेगाव, जुन्नर या दोन तालुक्यात रुग्ण अत्यवस्थ असताना  सुसज्ज ऍम्ब्युलन्स नसल्याने गैरसोय होत आहे.  सर्व लाईफ सपोर्ट सिस्टीमसहित व व्हेंटिलेटर असलेली अत्याधुनिक रुग्णवाहिका घेण्यासाठी विसलाख रुपयांची तरतूद केलेली आहे. याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करून ॲम्बुलन्स आपल्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास मंचरचे प्रथम नागरिक दत्ता गांजाळे यांनी व्यक्त केला. आंबेगाव, जुन्नर मधील अत्यवस्थ रुग्णांसाठी याचा फायदा होणार आहे. या रुग्णवाहिका मध्ये उपचारासाठी डॉक्टर हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे असतील. यासाठी  पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,  गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे  तसेच मंचर ग्रामपंचायतचे उपसरपंच, सदस्य यांनी पाठिंबा दिला आहे. अशी रुग्णवाहिका  घेणारी ग्रामपंचायत मंचर ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलीच ग्रामपंचायत असेल !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!