वाफगाव येथे यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी
महाबुलेटीन न्यूज : अमित पापत
वाफगाव : महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती त्यांच्या जन्मस्थानी मौजे वाफगाव ता. खेड, जि. पुणे येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
महाराजा यशवंतराव होळकरांच्या जन्मस्थानी राणीमहालात मुर्ती पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सभास्थानावर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. यावेळी वाफगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच अजय भागवत, बाळ सुर्वे पाटील, धनंजय भागवत, बाबाजी कोरडे, विनिम सुर्वे, विद्यालयाचे मुख्याध्यापक मगदूम सर व शिक्षक वृंद उपस्थित होते.
अहिल्या रत्न फौंडेशनचे अध्यक्ष विक्रांत काळे, महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष योगेशराजे होळकर, कार्याध्यक्ष किरण सोनवलकर पाटील, उपाध्यक्ष विकास माने, सचिव योगेश काळे, सदस्य राहुल सलगर आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तर महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य व श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय वाफगाव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.