Thursday, April 17, 2025
Latest:
खेडनिवड/नियुक्तीपुणे जिल्हाराजकीयविशेषशैक्षणिकसामाजिक

वंजारी ओबीसी विकास महासंघ’ संघटनेच्या “राष्ट्रीय संपर्क प्रमुख”पदी दादासाहेब ढाकणे

‘वंजारी ओबीसी विकास महासंघ’ संघटनेच्या “राष्ट्रीय संपर्क प्रमुख”पदी दादासाहेब ढाकणे

 

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : वंजारी समाजाच्या विविध प्रश्नांवर वंजारी ओबीसी विकास महासंघ सातत्याने आवाज उठवत असतो. रविवारी दि.16/8/2020 ला या कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यात आला असून दादासाहेब ढाकणे यांना “राष्ट्रीय संपर्क प्रमुख” पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. वंजारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रामराव लव्हारे यांनी त्यांची निवड केली.

 

सध्या वंजारी समाजाच्या प्रश्नांवर ‘वंजारी ओबीसी विकास महासंघ’ आक्रमकपणे आवाज उठवत असून या संघटनेच्या कार्यकारिणीत फेरबदल करून दादासाहेब ढाकणे हे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात आळंदीचे अधिवेशन, अहमदनगर – पुणे येथील भगवानबाबा पुण्यतिथीचे कार्यक्रम यशस्वी केले होते. आता त्यांच्यावर राष्ट्रीय संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्रातील समाज बांधव व खेड तालुक्यातील चाकण, राजगुरूनगर व आळंदी येथील समाजबांधवांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्राचार्य यशवंतराव पवार, संस्थेच्या सचिव प्रा. सौ. देवयानी पवार, संचालक जयवंतराव पवार, सर्व शिक्षकवृंद व सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष उत्तमराव पोटवडे, सचिव मेदगे सर, सर्व विषय संघटनेचे अध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी, खेड तालुका क्रीडाशिक्षक संघटनेचे अध्यक्ष रामदास रेटवडे, सचिव शेख सर व सर्व पदाधिकारी, शिक्षकेतर संघटनेचे प्रमुख विजय पवार, बाळासाहेब मुळे व त्यांचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी दादासाहेब ढाकणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!