Friday, May 9, 2025
Latest:
कोरोनापुणे

वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून नागरिकांचे आगमन : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : वंदेभारत या मिशनअंतर्गत चौथ्या टप्प्याची सुरुवात 4 जुलै 2020 पासुन सुरु झाली आहे. पुणे विभागामध्ये 17 जुलै 2020 अखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून 457, दुस-या टप्प्यामध्ये 789, तिस-या टप्प्यामध्ये 2 हजार 297, चौथ्या टप्प्यामध्ये 1 हजार 447 अशा एकूण 4 हजार 990 व्यक्तींचे परदेशातून आगमन झालेले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 4 हजार 72, सातारा जिल्हयातील 240, सांगली जिल्हयातील 217, सोलापूर जिल्हयातील 242 तर कोल्हापूर जिल्हयातील 219 व्यक्तींचा समावेश असल्याची   माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!