वडिलांच्या स्मृती जतन करण्यासाठी मुलांनी वास्तुसमोर केले वृक्षारोपण, खराबवाडीतील कड कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम..
वडिलांच्या स्मृती जतन करण्यासाठी मुलांनी वास्तुसमोर केले वृक्षारोपण, खराबवाडीतील कड कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम..
महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
चाकण : वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन न करता वडिलांचे कायमस्वरूपी स्मरण व्हावे म्हणून मुलांनी झाड लावून त्यांच्या स्मृती जतन करण्याचा एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अस्थी विसर्जन करण्याची प्रथा समाजात असते, मात्र खराबवाडी ( ता. खेड ) येथे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कड व अनिल कड यांनी आपले वडील प्रगतशील शेतकरी स्वर्गीय भिकाजी सखाराम कड यांच्या स्मरणार्थ त्यांच्या अस्थींचे पाण्यात विसर्जन न करता आपल्या घरासमोर झाड लावून त्यांच्या अस्थींचे त्यात विसर्जन करून वडिलांच्या स्मृती जतन केल्या आहेत. गावचे माजी उपसरपंच प्रकाश खराबी यांच्या संकल्पनेतून व चुलते पीडीसी बँकेचे निवृत्त अधिकारी निवृत्ती सखाराम कड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी जनसेवा बँकेचे शाखा व्यवस्थापक शिरीष चिरपुटकर, उद्योजक राहुल सावंत, उद्योजक अमोल पाटील, पीडीसीसी बँकेचे अधिकारी दत्तात्रय बोत्रे, स्वामी समर्थ स्कुलच्या मुख्याध्यापिका विद्या पवार, सर्व स्टाफ, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हनुमंत देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका खजिनदार अरुण सोमवंशी, माजी उपसरपंच काळुराम केसवड, खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोरक्षनाथ कड, अनंतकृपा पतसंस्थेचे चेअरमन माणिक खराबी, अकमेचे पाटील साहेब, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पुणे जिल्हा स्वच्छता व व्यसनमुक्ती समितीचे उपप्रमुख हभप. दत्तात्रय कड, खेड तालुका अध्यक्ष हभप. सोपान खराबी, सोसायटीचे संतोष डांगले, उद्योजक अनिल कड, राजेंद्र कड, प्रशांत कड, प्रथमेश कड, ज्ञानेश कड आदी मान्यवर उपस्थित होते. जनसेवा बँकेचे शाखा व्यवस्थापक शिरीष चिरपुटकर यांनी स्वर्गीय भिकाजी कड यांच्या स्मृतींना उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण केली.
००००