वडगाव नगरपंचायतीच्या वतीने गणेशविसर्जनसाठी कृत्रिम हौद
महाबुलेटीन न्यूज : तुषार वहिले
वडगाव मावळ : कोविड १९ च्या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याची सूचना केली त्या अनुषंगाने वडगाव नगरपंचायत, पोलीस स्टेशन व पत्रकार संघाच्यावतीने ‘एक गाव एक गणपती’ चे आवाहन केले होते त्यास बावीस गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला.
वडगाव मध्ये सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते, त्याची तयारी म्हणून नगरपंचायतीच्या वतीने तात्पुरते कृत्रिम हौद बांधण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे व उपनगराध्यक्ष चांद्रजित वाघमारे यांनी दिली.
हौदाची माहिती खलील प्रमाणे :-
प्रभाग क्रमांक ३ : केशवनगर, नवीन पाण्याच्या टाकी शेजारी
प्रभाग क्रमांक ६ : रमेश कुमार सहानी रोड,
प्रभाग क्रमांक १० : पोलिस स्टेशन शेजारी,विजयनगर
प्रभाग क्रमांक ११ : माळी नगर ,क्रिकेट मैदानावर
प्रभाग क्रमांक १७ : श्री छत्रपती संभाजी महाराज नगर
नगरसेविका पूजा वहिले यांच्या वतीने फिरता हौद ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी नदीचे प्रदूषण टाळून हौदातच गणेश विसर्जन करावे, असे आवाहन सर्व नगरसेवकांच्या वतीने करण्यात आले.
——–