…अन्यथा कारखान्यास गाळपाचा परवाना देणार नाही : साखर आयुक्त शेखर गायकवाड
महाबुलेटिन नेटवर्क। प्रतिनिधी
इंदापूर : ऊस उत्पादकांची एफआरपीची थकीत रक्कम पूर्ण केल्याशिवाय कोणत्या ही साखर कारखान्यास गाळपाचा परवाना देणार नाही, असे आश्वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ‘प्रहार जनशक्ती’च्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळास दिले आहे,अशी माहिती प्रहारचे कार्यकर्ते नानासाहेब लोंढे यांनी दिली.
प्रहार संघटनेचे प्रमुख व राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या सुचनेनुसार राज्यात ज्या कारखान्यांनी मागील हंगामातील शेतकऱ्यांचे ऊस दरातील देणे अजून पूर्ण केलेले नाही. कामगारांचे पैसे दिले नाहीत,नअशा एकाही कारखान्यास थकबाकी दिल्याशिवाय गाळप परवाना देऊ नये अशा आशयाचे निवेदन सादर करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवक्ते शंभूराज खलाटे,सांगलीचे जिल्हाप्रमुख स्वप्नील पाटील,अपंग क्रांती साताराचे जिल्हाप्रमुख अमोल कारंडे,फलटण तालुका प्रमुख सागर गावडे,शिराळा तालुका प्रमुख बंटी नांगरे पाटील, सोलापूरचे किरण भांगे यांच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. त्यावेळी गायकवाड यांनी वरील आश्वासन दिले असे लोंढे यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा