उपनगराध्यक्ष धीरज मुटके यांची नगरसेवक परिषद मुंबई, महाराष्ट्र संघटनेच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : नगरपरिषदेचे मा. उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक धिरज प्रकाश मुटके यांची नगरसेवक परिषद मुंबई, महाराष्ट्र संघटनेच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष राम जगदाळे व सरचिटणीस कैलास गोरे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. मुटके यांनी चाकण मध्ये मोठ्या प्रमाणात भरीव निधी मंजूर करून कामे केली, तसेच कोरोनाच्या महामारीत गरजूंना भरपूर मदत केली. तसेच विविध संस्थावरही ते कार्यरत आहेत. नगरसेवक परिषदच्या माध्यमातुन विधायक उपक्रम तसेच नगरसेवक यांच्या समस्या, हक्क यासाठी लढणार, असा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
—–
जाहिरात